...

7 views

अंतराने अंतरीचे हळवे पाखरु बागडेना।
तुझ्या भिरभिरणाऱ्या आठवणींविना जगने आवडेना,
अंतराने अंतरीचे हळवे पाखरु बागडेना।
जसा सूर माझा छेडत होता तार तुझ्या मनाची
कंठाविना आवाज गुंतला शब्दही सापडेना
अंतराने अंतरीचे हळवे पाखरु बागडेना।

ए न सख्या एकदा तरी कुशीत घे बिलगूनी
कुपीतले मग सुख पाहू आभाळ उलगूनी,
मग तक्रार नसावी दोन्ही जीवांना की वेळही दवडेना,
अंतराने अंतरीचे हळवे पाखरु बागडेना।

स्नेहाने मग हळुवारपणे वीण विणावी नात्याची
प्रश्नांतच गुरफटू नये नातं साथ हवी निष्कर्षाची,
कीरऱ रात्रीच्या गर्द काळोखी तो अश्रू साथ सोडेना
अंतराने अंतरीचे हळवे पाखरू बागडेना।
© Hayati