...

5 views

आता काही उरले का शेष?
गेलास तू अनेक अनुत्तरित प्रश्न सोडून...
माझ्या आयुष्याच न सुटलेलं कोड बनून....
विरहाच्या किर्द अंधाऱ्या कोठडीत ढकलून....
जिथे रडू ही शकत नाही मी धाय मोकलून...

वाटलं नव्हतं कधीच सुटेल आपली घट्टसाथ...
सोबत राहतील अमीट स्मृतींच्या काळोख्या रात..
प्रेमाच्या बदल्यात तू करशील असा विश्वासघात..
मागे उरेल फक्त आणि फक्त मी आणि एकांत...

गेलास तिथे तू जिथे पोहचत नाही माझी साद...
राहिली जुनी कवितेची डायरी आणि तुझी याद...
काय बोलू, काय सांगू जर हरवला आहे संवाद?
आता संपलेत आपल्यातील सारे वाद -विवाद...

चालतो आहेत दोघे आयुष्य वाट ही समांतर...
इतके दुरावलो की वाढत गेले आपल्यात अंतर...
तरी ही वेडी तुझी आठवण येते मज निरंतर...
आणि साऱ्या शंका कुशंका क्षणात होती छू मंतर...

वाटते मग होते आपल्यात काहीतरी नाते विशेष..
विचारते मग मनाला आता काही उरले का शेष...?
अरे!कुठल्याच नात्याला भाग जात नाही निःशेष..
अन् कवटाळून बसते मग आठवणींचे भग्न अवशेष ....
© Rashmi Kaulwar