...

6 views

लिमलेटची गोळी
दुकानतल्या बरणी मधले
चंद्रकोर ते माणिक मोती
बालमनाच्या बालमुठीतील
स्निग्ध ओलसर गोड स्मृती..
दहा पैसे कनवटीतले
हळूच आजी  काढून देई
हर्षभराने वाऱ्या संगे
दुकानात त्या पाऊल नेई....
दहा पैशातुन दहा गोळया त्या
हर्ष मनी पण लाखभराचा
लाल रंग पसरे जिभेवर
आंबट गोड मधूर चवीचा .....
असती दोस्तही हजरच तेव्हा
गोळी गोळी वाटली जाई
गळ्यात हात टाकून फिरणे
मित्र प्रेमाला उधाण येई.....
आजही आठवे दृश्य मनोहर
जेव्हा पाहतो लिमलेटची गोळी
कुठे ती आजी  दोस्त राहीले ?
प्रेमावीन त्या ...रिक्त ही झोळी !

..... शिव पंडित
 
© All Rights Reserved
© शिव पंडित
#marathikavita