...

9 views

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रश्नाला उत्तर,
चंद्राला रात्र,
तसेच तुम्ही आहात,
वेगळे पण एकत्र.

तप्त उन्हात वाटसरूला,
जसा आधार सावलीचा,
तसेच तुम्ही आहात,
आधार माझ्या जगण्याचा.

दुधाला जशी साखर,
फुलाला जसा सुगंध,
तसाच गोड आहे,
तुमच्या दोघांचा संबंध.

जशी सागराकडे,
कायम नदी वाहते,
तसेच वाहो तुमचे प्रेम,
आणि कायम राहो हे नाते.

एक रूसला,
तर दुसऱ्याने समजावे,
एक डगमगला,
तर दुसऱ्याने सांभाळावे.

रुसवा-फुगवा,
वाढवे नात्याची गोडी,
प्रेमात व सुखात,
कायाम राहो तुमची जोडी.

लाभो तुम्हाला सुख समृद्धी,
हीच माझी इच्छा,
असेच राहो तुम्ही कायम एकत्र,
व तुम्हाला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
© Navi07