...

14 views

खोटा रुसवा...
आहेस का तू,
अजून बसलेला रुसून...
मी तर केव्हांची गेली,
बघ सगळं विसरून...

नाही राहतं राग,
माझ्या जास्त वेळ मनांत...
असतोचं मुळी तो,
राग जाणारा क्षणांत...

भांडणात ही,
प्रेम लपलेलं असतं...
म्हणून आपल्या माणसांवर,
हक्कानं ओरडता येतं...

सोड तो अबोला,
कर विचारपूस जरा...
नाहीतर मी ही आणणारं,
खोटा खोटा राग खरा...

{पूनम}🖊️