...

6 views

माझी कविता
माझी कविता
जगन्याच बळ ,लढन्याची ऊमेद मानसाच माणुसपन शिकवते माझी कविता.

भावना,व्यासंग प्रेम,जिद्द, संघर्ष शब्दांमध्ये मांडायला शिकवते माझी कविता.

हर्ष, दुःख,राग,लोभ शिकवते माझी कविता.

आपेक्षांच ओझ वाहत मायेची झालर पांघरुन सन्मानाच जगायच शिकवते माझी कविता.

अन्याय,टीका झिडकारुन खंबीर ऊभा राहन्याची प्रेरणा देते माझी कविता.

संतीचे नीतिमूल्ये, विचारवंताचे विचार अंगी स्विकारुन घडते माझी कविता.

तत्वज्ञानाचे धडे गिरवत कविच कविपन जपत लेखकातुन माणुस घडवते माझी कविता.

अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाची मशाल पेटवते माझी कविता.

आयुष्याच चांदन व्हावं अशी सोनेरी साद देते माझी कविता.

सोनेरी साद देते माझी कविता.
© आठवनीचा कोंडमारा