...

5 views

गरज स्वतःला बदलवण्याची

लहानपणी आयुष्य जगताना
आधार होता आई वडिलांचा,
आता आयुष्यात झालो मोठा
तर आधार आता स्वतःच्याच पायांचा

आयुष्यात किती ओळखी
थोर वेक्तीच्या झाल्या मोठ्या,
सगळ्यांना जपण्यासाठी शेवटी
विचार करावा लागतो मनाने छोट्या

गरज तर होतीच आयुष्यात
चालताना स्वतःला बदलण्याची,
जबाबदारी होती अंगावर खरी आता
आई वडिलांना सांभाळण्याची

काही उपयोग नसतो मरेपर्यंत
पैश्याची दौलत कमवलेली,
चार सुखाचे शब्द बोलून आपल्या हृदयात नसतील तोपर्यंत माणस सामावलेली

गरज आहे आयुष्यात स्वतःला
जीवनात बदलण्याची...
अंगी आता खरच करा
सुरुवात माणुसकीने जगण्याची.........
© @Swa_hitkalambate 1044.