...

8 views

तु गेलीस
तु गेलीस तेव्हा
हृदयावर घाव झाला होता
आठवणींचा पाऊस
हुंदक्यात कोंडला होता

तुटक मनं माझ
कोपर्‍यात रडतं होत
आठवणींच ओझ तुझ्या
डोळ्यांत वाहत होत

तुच प्रेमाच्या बेड्या
पायात माझ्या अडकवल्या
का ग गेलीस तु सोडुन
प्रेमाच्या वाटेवर एकट्याला

गुदमरत होत आज
मन आतल्या आत
अडकत होता आता
श्वासा मध्ये श्वास

आज हा ढग ही...
माझी साथ देत होता
तुला थांबवण्यासाठी
आज तो ही रडत होता