...

33 views

तो लॉकडाऊन
@Pranil_Gamre
लोकांच्या गर्दीत वावरणाऱ्या पशुपक्षींंऩी आज सर्विकडे  शुकशुकाट पाहिला
कारण आज कामकाजाला जाणारा माणुस पहिल्यांदाच  घरात बंदिस्त  राहिला

दिवसाचे फक्त काही तास घरी असणारा माणुस आज चोवीस तास घरीच थांबला
पण लॉकडाऊनमुळे का असेना त्याला त्याच्या घरच्यांशी वेळ घालवता आला

काही दिवसांचा का असेना तो पशुपक्षींंना आनंद देऊन गेला
त्याच्यामुळे आज त्यांना हवेत मोकळा श्वास घेता आला

मनुष्याला आज घरी थांबण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय दिसत नव्हता
कारण घराच्या दारी त्याला यमराजाचा हाक ऐकू येत होता

हातावर पोट असणाऱ्यांना आपल्या गावी परतण्याची वेळ  आणली
पर्याय दिसेना म्हणून काही लोक पोटा पाण्यासाठी सरकारवर अवलंबून राहिली

संधी साधून राजकारण्यांनी आपल्या फायद्याची पोळी भाजत राहिले
भयानक संकट असताना देखील असे नालायक मनुष्य सर्वांनी पाहिले

प्रदूषित असणारं देश काहीसं प्रदूषित दिसत नव्हतं
कारण सर्विकडेच मनुष्य प्राणी आज घरीच थांबलं होतं

घराचं दार ओलांडणार्याला त्या विषाणूने घट्ट धरलं होतं
त्याच्यापासून सहजासहजी सुटका करून घेणं इतकं सोप्प नव्हतं

त्या दिवसात काहींना उपासमारीलाही सामोरं जावं लागलं
तर त्या लॉकडाऊन ने काहीजणांना मृत्यु मुखी पाडलं

परीक्षा पाहिली ह्या दिवसात माणसाने स्वतःच्या धीराची आणि संयमाची
शिष्ट पाळत अमलबजावणी केली देशाने सरकारच्या नियमांची

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांंचे ज्याने त्याने वेगवेगळ्या तर्हेणे मानले आभार
कर्तव्यदक्ष ते , ते आहेत महान कारण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सोडून आले घर परिवार

#lockdownpoem #lockdown #nation #lockdowndaysindia
© Pranil_Gamre