...

6 views

अभिमान मराठी
येत नाही इंग्रजी त्याची,
लाज बाळगायची कशाला!
हिम्मत लागते गड्या,
स्वतः ची भाषा जपायला.

म्हटले कुणी अडाणी,
पर्वा नाही आम्हाला,
ही भाषाच आणते धार,
आमच्या या लेखनीला.

राग नाही आम्हाला,
कुणी अनपढ म्हटल्याचा,
गर्व आहे आम्हाला,
आम्ही "मराठी" असल्याचा !!!

(कु. तन्वी सावंत )
27 फेब्रुवारी 2023
प्रेरणा - कवी कुसुमाग्रज