...

3 views

उठ मित्रा येवढ्यात खचु नकोस...
उठ मित्रा येवढ्यात खचु नकोस...
उभ आयुष्य सरायचय आपलं, येवढ्यात हार मानू नकोस...
मागे राहिलास तर लोक तुझ्यावर हसतील...
पुढे निघालास तर लोक तुझ्यावर जळतील..
तु कितीही चांगला वागला ना, तरी ही तुझे गोड शब्द त्यांना खुपतील...
पण तु विचार करु नकोस...
कुत्र्यांच काम असतं भुंकनं, ते भुकतील...
पण तु त्या कडे लक्ष देऊ नकोस..
पुढे चालत रहा...
आयुष्याच्या गाडीला पण योग्य रस्ता भेटेल..
चांगला जॉब नाही ये, पगार कमी ये..
या विचारांना बळी पडू नकोस...
छोट्याशा पगारात पण आयुष्य सुखाने नांदेल..

यशाचं शिखर सर करताना खूप सारे चढ-उतार येतील..
तु पुढे चालतांना, अनेक जन पाठीमागुन तुझ्यावर हसतील..
शिखर सर करताना अनेक छोटे-मोठे दगड तुझ्या वाटेत येतील...
मोठ- मोठ्या नाही तर, छोट- छोट्याशा दगडांनी तुला ठेच लागेल..
खुप दुःख होईल, त्रास होईल, हा प्रवास येथेच थांबवावासा वाटेल..
पण तु थांबु नकोस..
अशा दगडांना पायाखाली तुडवून तु पुढे चालत रहा...
जे ध्येय निवडल, त्या ध्येयाची वाट पहात रहा..

जस-जस तु शिखर सर करशीलना, तस-तस तुला आजु- बाजूचं जग कसं आहे ते दिसायला लागले..
अनेक दगड मुद्दाम तुझ्या वाटेत येतील..
तुला घसरुन खाली आन्याचा प्रयत्न करतील..
पण त्यांना घाबरू नकोस..
कितीही वेळा ती वाट सर करायला लागली तरी चालेल..
पण तु मागे सरू नकोस...

हे शिखर सर करताना खूप वाईट लोक भेटतील..
पण त्या बरोबर काही चांगले लोक पण असतील..
ते तुझ्या प्रत्येक सुख- दुःखात तुझ्या सोबत उभे रहातील..
त्यांना कधीही विसरू नकोस..
ज्या आई-बापानी तुला जन्म देऊन, येवढ्या सुंदर सु्ष्टीच दर्शन घडवलं..
त्यांना कधीही दुःखवु नकोस..
त्यांनी केलेल्या कष्टाचे फळं जो पर्यंत तु त्यांच्या ओंजळीत देत नाहीस..
तो पर्यंत तु स्वतःच आयुष्य संपवायचा विचार ही करू नकोस..

मित्रा जिवनात कितीही अडथळे येवू देत..
पण तु कधीही खचु नकोस...
- अजित पवार(Aj)
© All Rights Reserved