...

9 views

👬मैत्री....
एक तरी मैत्रीण असावी
सोबत आपल्या सदा रहावी
मनातल्या सारर्या गुपितांची
तीच एक साक्षिदार व्हावी
दिवसाची सुरुवात असावी
तिच्याच एका संदेशाने
उलटावी काळाची पाने
सतत तिच्याशी हितागुजाने
मैत्री जन्मभराची परी ही
नात्यामध्ये ना गुंतावी
पवित्र या नात्याला कधीही
अधिकारांची झुल नसावी.......🖋
sanjivani giram