...

50 views

त्याच्या जवळच...
ज्याच्यावर आपला विश्वास असतो,
त्यालाच आपण मनातलं सांगतो...

ज्याचा आपल्याला आधार वाटतो,
त्याच्यावरच आपण अधिकार गाजवतो...

ज्याच्याकडे आपल्यासाठी वेळ असतो,
त्याचीच आपण आतुरतेने वाट बघतो...

जो आपलं ऐकून घेतो,
त्याच्या पुढेच आपले गाऱ्हाणे मांडतो...

जो आपल्या भावना जाणतो,
तोच आपल्या मनाला स्पर्श करतो...

ज्याच्यावर आपला जीव असतो,
त्याच्या जवळच आपण जीवातलं बोलतो...

ज्याच्यावर आपला हक्क असतो,
त्याच्या जवळच आपण हट्ट करतो...

ज्याचा आपल्याला राग येतो,
त्याच्यावरचा तो लटका राग असतो...

जो आपल्यावर रुसतो,
तोच रुसवा दोघांचा दुरावा नाहीसा करतो...

जो आपल्यापासून दूर असतो,
त्याचीच आठवण मन आपलं काढतो...

जो आपल्यावर प्रेम करतो,
तो काळजी पोटीच आपल्याला समजावतो...

ज्याच्यावर आपण प्रेम करतो,
तोच आपल्याला प्रेमाने समजून घेतो...

{Poonam}🖊️