...

10 views

जर ठरले आहे...
जर ठरले आहे तर ते घडणारच
जवळ येऊनही ते दुरावणारच.!!

किती हि दुर लोटले तरी ते घडणारच
सुखा मागुन दुःख येणारच.!!

तु कितीही कर सुरुवात
या सुरुवातीचा शेवट होणारच.!!

अकस्मात मेघ दाटून आले तर...
भर वैशाखात सुद्धा पाऊस पडणारच.!!

भर दिवसा ढवळ्या जर विसरल्या आठवणी...
रात्री अपरात्री त्या मनाचा ठाव घेणारच.!!

अर्ध्या रात्रीला जर स्वप्नांत तो आठवतो
तर त्यालाही डचकुन जाग येणारच.!!

मी बंद करू का दरवाजे खिडक्या...?
वादळाची थाप त्यावर बसणारच..!!