...

2 views

मैत्री...
मैत्रीचं गोड नातं
मित्रत्वाचा गोडवा देतं,
मित्रत्व एक नाजूक धागा
म्हणुनच त्याची हृदयात जागा;

मित्रत्वाला बांधील मित्र असतात जे मित्रत्वाला खरा अर्थ देतात, खरे मित्र नशिबानेच मिळतात जे आयुष्यालादेखील नवी दिशा देतात;

आमची मैत्री भावनानिष्ठ,
आमची मैत्री खूप घनिष्ठ;

माझ्या सुख - दुःखात ते पुरून उरतात, भावनांना आधार देतात, मनातली दुःखे वाहून नेतात, सुखात आनंदाचा वर्षाव करतात;

कुणालाही हेवा वाटेल अशी आमची मैत्री, आयुष्यभर टिकून राहिल आहे ही खात्री...!!!
- श्रावणी संजय.