...

11 views

आठवणीचा पाऊस..

एक पाऊस तुझ्या आठवणीचा ,
भिजवून जातो माझे मन !

सांगता काही येत नाही,
पण उत्साहून जातो माझे तन !

सौंदर्याचे मेघ तुझे ,
भरले माझ्या आयुष्यात !

आशेचा इंद्रधुष्य दिसतो
मेघाच्या त्या ऊनात !

थेंब तुझिया स्पर्शाचा,
गुंतवून जातो माझ्या अश्रूत !

आठवणीचा तो पाऊस,
कोसळून गेला कल्पनेच्या सरीत!!
- गौरव देसाई
© Gaur_av