...

15 views

अंत..
एकाकी या जीवनात आधार नाही कुणाचा
दुख्खाचे चटके लागून अंत या देहाचा
सर्वत्र दिशा अंधारलेल्या मार्ग ना सापडे कशाचा
पुन्हा नव्याने बहरण्याची कोणतीच नाही आशा
माझे दुःख माझ्या उरी तमा नाही कोणाला
तळमळ माझ्या मनाची कशी सांगावी जगाला
मातीत मिसळण्यास देह मन झाले हे आतुर
का रे विधात्या माझ्याच नशिबी दुःखाचे हे सुर
पुन्हा जन्म नको आता नकोत या यातना
हेच मागणे मागतो आता निरोप जगाचा घेताना...