...

9 views

पृथ्वी......
पृथ्वी म्हणजे आपल जीवन,
महराष्ट्राच्या लाल मातीचे भवन,
ह्या पृथ्वीवरती शेतकरी राबे कायम,
पीक घेण्यासाठी कष्ट्याचे पाऊल सयम,

सह्याद्री ही किती सुंदर आहे रे,
तिचे महत्व पृथ्वीच्या जागी रे,
कसे घडते हे सकाळ आणि रात्र,
पहाटे पडे सूर्याची किरणे पृथ्वीवरती मात्र,,

पृथ्वी वरती किती आहे संपत्ती भारी,
हि तर आपल्या निसर्गाची किमया सारी,
खनिज तेल पृथ्वीवरी मानवा पावे,
ते पाहुनी कसे मन भारावून जावे,,

पृथ्वी वरती राहणारे हे जग सारे,
स्वतःच्या ध्येयात गुंतले आहे रे,,
घडते खूप काही ह्या पृथ्वीवरी जगताना,
चुकीचे की बरोबर हे कळतही नाही त्या गोष्टीकडे बघताना,,

दुःख हे असे जगताना वाटेत येईल सारे,
पृथ्वी वरती मानवा हिंमतीने जगून पहारे,
पृथ्वी वरती आहे जगण्याचे खरे आपले स्वर्ग,
एकदा स्वतः उभा रहा नक्कीच मिळेल चांगले मार्ग.......
© @Swa_hitkalambate 1044.