...

3 views

तु सोबत असताना....
तु सोबत असताना
सारे दुःख विसरून जावे,
मोहरुन जाताना सुखाच्या
क्षणात त्या मी तुझा जवळ असावे,
निघुन जाता थोडा थोडा
वेळ हा मी तुझ्या मिठीत विरावे,
घट्ट माझ्यात तू विरताना स्वतःला न सावरावे,
मी टेकवत कपाळावर ओठ तुझ्या क्षणात सारी दुरावे संपावे,
असेल हे माझे तुझे नाते
नव्याने अजुनी घट्ट व्हाव.

टिनू भुजाडे.

© Tinu bhujade