अंधारलेल्या वाटेवर माझ्या विचारांचे पाऊल....
दिवस हा होता सुट्टीचा रे,
घरी बसून वैताग आलेला रे,
नाही जाता आले कुठे दिवसभर
रात्री पाऊले बाहेर पडली वाटेवर
एकांतात प्रवास हा करत होतो
घाई गडबडीत होता शेजारचा जो तो,
वाटेवर कशी विचारांची भर पडू लागली
प्रवास करताना कुणाची तरी साथ भासू लागली
कसे असे आज कंटाळा येण्याचे आले क्षण
घरी बसून सुध्दा लागत न्हवते कशातच मन
अगदी कंटाळून प्रवास केला चालू तोही रात्री
कुठे जावे ह्याची ही मनाला न्हवती मिळत खात्री
पाऊले एका अंधारलेल्या वाटेकडे चालू...