...

15 views

शोधते मी....
परफ्यूम च्या वासात
फुलांचा सुगंध शोधते मी...
जीन्स पॅन्ट च्या जमान्यात
साडी चोळी शोधते मी...
फास्टफूड च्या जमान्यात
कष्टाची कांदा-भाकरी शोधते मी...
विडीओ गेम्स घरा-घरात आहेत
विटी-दांडू सारखे खेळ शोधते मी...
2BHK च्या फ्लॅट मध्ये
देवघर शोधते मी...
बिल्डिंग च्या गर्दीत
तुळशीचे वृंदावन शोधते मी...
व्हाट्सअप्प च्या जमान्यात
आपुलकीचे बोल शोधते मी...
आई-बाबांच्या बिझनेस मध्ये
माझ्यासाठी प्रेमाचे वात्सल्य शोधते मी...
माणूसच माणसासाठी परका झाला
म्हणून माणसांच्या गर्दीत
माणूस शोधते मी........
☺️☺️