...

3 views

कमालीचे होते.
काही शालीचे होते,काही कमालीचे होते,
लोक आमुच्या ईथले सारे मशालीचे होते.

हे बाण गद्दारीचे मारले आपुल्याच लोकांनी,
जे पेलले धनुष्यबाण ते हमालीचे होते.

चिखल पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरी जो उडाला,
खुललेले कमळ खरेच दलदलीचे होते.

ते एक नाव वादळ झाले घेऊन गेले सत्ता,
ते होते निष्ठावान सारे काय कमालीचे होते!

हातच तर तोडले जे उठले होते क्रांतीसाठी,
आता उठलेच जे ते निव्वळ सलामीचे होते.

पाहतोस ना तू रे ‘बाळ’ हा तुझा महाराष्ट्र,
जे मोठे झाले तुझ्या समोर ते निलामीचे होते.
© वि.र.तारकर.