...

10 views

असे असावे घर...!
घर असावे तर असे,
सर्व गोष्टींनी परिपूर्ण
सर्व सुखांनी भरलेले
कायम हसत-खेळत राहणारे...!
सर्व माणसांनी भरलेले
आजी-आजोबांच्या भजनांनी
लहानग्यांच्या दंगा-मस्तीनी
तसेच, नवजात शिशुंच्या
किलकार्यांनी भरलेले असावे;
एकमेकांना समजून घेणारे
आजी-आजोबांची काळजी घेणारे
तसेच, रात्री हसत-खेळत झोपणारे आणि सकाळी हसत-खेळत उठणारे असावे...!
आयुष्यभर एकमेकांची मदत
करणारे, एकमेकांची काळजी
घेणारे, तसेच, शेवटपर्यंत
एकमेकांची साथ करणारे;
असे असावे घर, असे असावे घर...!
- श्रावणी संजय.