...

39 views

" साथ.."
"एक एक दिवा विझुन जाता ,
सांज , वेडी रात्र होता ,
बहरुन येई काळोखाचा लाटा..
धुंद वारा ही गुणगुणें , नवीन गाणे..
जेंव्हा दाटून येई मन ,
तोडून अश्रूंचा बांध ,
करे मोकळ्या त्या वाटा..
जेंव्हा रात्र पार होता ,
लागे पहाटेची चाहूल ,
दवबिंदूने सजली पहाट ,
नव-प्रकाशित आज पुन्हा तीच वाट..
सुटे काळोखाची साथ ,
हाती प्रकाशाचा हात..
प्रश्न पडे , किती वेळाची ही साथ..
माझेच मन वेडे बोले ,
जेंव्हा होईल पुन्हा काळोखाची पहाट ,
पुन्हा सुटेल तो हात ,
एक माझीच ती साथ , तूझ्या सोबती ,
असो काळोखाची पहाट ,
किंवा पहाटेचा काळोख.."
©sayali_s_1111

#love #relationship #friendship #shayari #heartbreak #poetry #selflove
#writco #sayali_s_1111
@Sayali_s_1111 @Writco