...

23 views

चला एकदा परत जगूया...!
कोण काय म्हणत आहे,
कोण काय करत आहे,
जग से मागे सरत आहे,
सर्व काही विखुरत आहे,
पहा या जगाला,
काय या जगाची सुरत आहे,
मातीतल्या मातीत सर्व काही मिसळत आहे, चला नवी संकल्पना करुया
चला एकदा परत जगूया...!

सर्व झाले आगळे वेगळे,
आले अंधार काळे काळे,
सर्वांस बोलायला वेळ नाही,
'गंमत' हा प्रकार ही धुळात जाई,
संपली सर्व रानराई,
कोणाला ही वेळ नाही,
अरे जगून घ्या,
जीवन काही खेळ नाही,
जीवनात कसलाच मेळ नाही,
चला नवी संकल्पना करुया,
चला एकदा परत जगूया...!

मैत्री करायला ही घाबरतो,
जीवनाला सोडून अनवानी पळतो,
जीवन निरस आहे असे म्हणतो,
स्वत:च जीवनाला रडवीतो,
स्वत:ला खोटे ध्यास धरवितो,
जीवनासाठी जीवन भर धावतो,
पण जीवन जगायलाच विसरतो,
आनंद मिळावा म्हणून,
आयुष्यभर झटतो,
अन् निराशा आली की,
स्वत:च स्वत: जीवन संपवितो,
चला नवी संकल्पना करुया,
चला एकदा परत जगूया...!

जीवनाने थांबून त्याला त्याच्या जवळ
बसावयास सांगितले,
पण त्याने 'घाई होते' म्हणून खोट्या वेळेचे घड्याळ दाखविले,
पण त्याने जीवनाचे घड्याळ नाही पाहिले,
त्याचे वेळ संपत गेले,
आणि सर्व काही विखुरत गेले,
पण जीवनाकडे बसला नाही,
त्याला कधी जगला नाही,
धावपळीला सोडून कधी तो,
त्याच्याकडे वळला नाही,
तो संपला, पण तो जीवन जगलाच नाही,
चला नवी संकल्पना करुया,
चला एकदा परत जगूया...!

नाव धावण्यापेक्षा एकदा जगून तरी पहा,
थोड़े थांबा थोडे आनंदी होऊन तर पहा,
चला एकदा परत जगूया.!

का आनंदाचा मुखवटा घेऊन फिरतो हा मानव,
काही कळत नाही,
ख-या जीवनाकडे कधी तो वळत नाही,
जीवन तो जीवनासारखा जगत नाही,
दिशा ही मात्र कळतं नाही,
जगून घ्या,
चला एकदा आनंदाने आनंद घेऊया,
सुंदर स्मृत्यांचा पुंजका ठेऊया,
चला परत मिरवूया,
चला नवी संकल्पना करुया,
चला एकदा परत जगूया...!
written by VANSHIKA CHAUBEY 🖍