...

23 views

माझी सखी
@Pranil_Gamre
सांजवेळी ती थोडीशी नटलेली होती
मनात थोडी रुसली होती
कदाचित माझी मैत्री तिला कळलीच नव्हती

समोर असून देखील अबोल तू राही
आता नसली जरी आपल्यात मैत्री
तरी माझ्या निखळ मैत्रीत सदैव तुलाच पाही

तूझ्या सोबत घलवलेले क्षण जेव्हा आठवतात
तेव्हा माझ्या पापण्या समुद्रा सारख्या ओलावतात
काय चुकलं माझं ज्याची शिक्षा तू अशी दिली
न बोलता अचानक आयुष्यातून निघून तू गेली

सांग द्रौपदी कृष्णाला ह्या सावरवे तरी कसे
तुझ्याविना त्याची तळमळ होत असे
तुझ्या देखील पापण्या ओलावतात
पण तू ते कुणाला दिसू देत नाही
शब्द ओठांवरती येऊ देत नाही मनातले मनातच राही

आज जरी गेला असला आपल्या मैत्री ला तडा
तरीही वाटे मला भरून येईल आपल्या मैत्रीचा घडा
मित्र असोवा मैत्रीण ते सारे खूप मिळाले
पण तुझ्याविना मैत्रीचे अर्थ हे अर्धवटच राहिले

मैत्रीतलंं हे प्रेम कधीच अटणार नाही
तू माझी सखी कायम राहशील हे सत्य कधी मिटणार नाही
#friendshipgoals #friendship #friendsforlife #she
© Pranil_Gamre