...

16 views

तू नि मी,......
तू नि मी,
मुसळधार पावसात
हातात हात घेऊन जातांना,
मला छेडणारा तो वारा,
तूला न आवडणारी ती चिकचिक
नि मला आवडणार्या त्या पावसाच्या धारा....

तू नि मी,
थंडीतल्या संधाकाळी
गूरफटलेल्या वाटेवरून जातांना,
अंगात भरलेली ती शिरशिरी,
तूला न आवडणारा तो थंडावा
नि मला आवडणारा तो गारवा....

तू नि मी,
एखाद्या संध्याकाळी तळ्याकाठी
पाण्यात पाय हलवतांना ,
पाण्यातले गजबजून उठलेले तरंग ,
तूला न आवडणारा तो ओलावा
नि मला आवडणारा तो पाण्यातला ओलावा.....

तू नि मी,
संध्याकाळी पाऊस थांबल्यावर
ओल्या पाऊलवाटेवरून फिरतांना,
हळूवार कानात गूणगूणणारी ती झूळूक,
तूला न आवडणारी ती पावसाची रिमझिम
नि मला आवडणार्या ती गरम चहाची रिपरिप.....
Ady...