...

7 views

नदीतून वाहे सुगंधी फुल
नदीतून वाहे सुगंधी फुल
फुलाचा सुगंध जाई भुल
भुलताना नाही लागला सूगावा
नदीचा काठी आश्रय असावा

आश्रयाला फुल नदीकाठी बसले
डोळा कधी लागला हे त्याला ही ना कळले
तापलेले उन शेवटी थंडगार झाले
समजले च नाही सकाळचे सायंकाळ झाले

नदीचा वेग अजून वाढू लागला
फुलाचा तोल किनाऱ्यातून सुटला
पाकळ्या नी पाकळ्या नदीत वाहिले
काटेरी देठ मात्र नदी काठी राहिले
© vinayakshivthare919