...

6 views

माझा राग
माझा राग म्हणजे मेणबत्ती सारखा आहे
फुंकर घातली की लगेच विझतो
फक्त फुंकर घालणारी तू पाहिजे

प्रत्येक श्वासात माझ्या तू आहेस
घेताना जीवन तर सोडताना मरण आहे
तू आहेस माझ्या संगती नेहमी
मला हेच काफी आहे
जीव आहेस तू माझा म्हणून तुझ्या प्रत्येक चुकीला
आयुष्यभर माफी आहे

सोबती जीवनाची माझ्या तू
संगत आपुली सदा असावी
नाराजी तुझी न माझी
प्रेमाच्या दोन शब्दाने पुसावी

प्रेम आहे आणी असच कायम राहील
कुठल्याही प्रसंगी हाथ सुटणार नाही
प्राण गेला तरी बेहत्तर पण आयुष्यभर
साथ तुझी सुटणार नाही
© AG