...

6 views

आई मला तुझा लेक व्हांयचय..
आई..
अनवानी पायांनी चालताना, तुझ्या पायांची ढाल व्हांयचय...
तडपत्या उन्हात राबताना, तुझ्या डोहिवरची छाव व्हांयचय..
उपवाशी पोटाची खळी भरण्यासाठी, अन्नाचा घास व्हांयचय...
होच जन्म नव्हे, तर जन्मोजन्मी आई मला तुझा लेक व्हांयचय..

आई..
नयनांतुन निघणाऱ्या तुझ्या आसवान साठी सुखाचा बांध व्हांयचय..
घरातल्या प्रत्येक व्यक्तिचा, तुझ्या साठीचा मान व्हांयचय..
तुझ्यावर लादणाऱ्या प्रत्येक रूढी परंपरेचा विलेवाट व्हांयचय..
होच जन्म नव्हे, तर जन्मोजन्मी आई मला तुझा लेक व्हांयचय..

आई ..
तुझ्या चेहऱ्यावर आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्ठी मागच गुढ व्हांयचय..
भाकरी भाजुन भाजलेल्या तुझ्या करानसाठी, हवेची फुंक व्हांयचय..
तु पाहिलेल प्रत्येक स्वप्न पुर्ण करण्यासाठी, देवाचा दुत व्हांयचय..
होच जन्म नव्हे, तर जन्मोजन्मी आई मला तुझा लेक व्हांयचय..

आई..
तुझ्या कर्णानसाठी सुखाच बोल व्हांयचय..
तुझ्या नयनांसाठी दृष्टिच रूप व्हांयचय..
तुझ्या करानसाठी हिंमतीच बळ व्हांयचय..
तुझ्या चरणांसाठी फुलांचा पद व्हांयचय..
तुझ्या आयुष्यासाठी कष्टाचं फळ व्हांयचय..
होच जन्म नव्हे, तर जन्मोजन्मी आई मला तुझा लेक व्हांयचय..

आई मला तुझा राम व्हांयचय..
आई मला तुझा शाम व्हांयचय..
होच जन्म नव्हे, तर जन्मोजन्मी आई मला तुझ्या गभ्रातला प्राण व्हांयचय..
- अजित पवार (Aj)
© All Rights Reserved