...

3 views

अनमोल क्षण
मोहमायेत मी गुरफटलो असताना,
आशेचा किरण घेऊन जीवनात माझ्या आलीस तू,
हृदयात घर बनवून नकळत निघून गेलीस तू,
तुला आठवतो तेव्हा अश्रुंनी कंठ दाटून येतो,
कधी तरी भेटू आपण या समजूतीने मी मनाला सांत्वन देतो,
एका प्रेम भरल्या नजरेत माझ्या हृदयात तू विसावलीस,
मला आपले बनवून दूर जाऊनही जगण्याचे बळ देऊन गेलीस,
शोधतो कधी पाहतो तुला मी भूतलावर सर्वत्र,
अनमोल क्षण होते ते तूझ्या सोबतीचे पवित्र
© kunaljijadhav