...

1 views

सखी
सखे तुझ्या आठवणीत जरी,
रात्र हरवुन गेलो तरी
मन तुला शोधत राही
असे वाटे जादू व्हावी
साक्षात तू समोर यावी...!

येताच तुला जवळ घेईन
तुझा हात हातात घेईन
आणि तुला मी सांगीन
जेव्हा जेव्हा तुझी आठवण येई
तेव्हा तेव्हा मन गहिवरून येई....!

अजूनही तूझ्या शृंगाराची नशा
अन् तुझ ते गुलाबी हास्य
माझ्या नजरेत तसच राही
माझा जीव तुझ्याविणा येडापिसा
तुझ्याविणा मी राहू कसा....!
सखी
मनिषा मिसाळ(लोखंडे)