...

7 views

शब्द
तुझ्या माझ्या भावनांचे
आहेत शब्द सारथी प्रिये
शब्दातच सांभाळूया ती
चिंब ओथंबलेले मन प्रिये

जगास नको देखावा
उगाच कशास पसारा
अंतरहृदयात जपावा
दोन मनांतील ओलावा

रुसवे फुगवे कैक बहाणे
पुरे कल्पकतेने फवारे
वास्तवात जगूया थोडे
उगाच नको अंगी शहारे
© Soman