...

1 views

दिसणं
तू दिसाया असला काळा,नकटा, बुटका,
तरी मनाला लावुन घेवू नको इतका....

तुझे आतून तरी मन आहे ना स्वच्छ,
मग,कुणीही वागुदे तुझ्याशी तुच्छ....

हि दुनिया नावं ठेवण्यासाठीच असते,
त्यांचे ऐकत बसू नको नुसते.....

कुणाचे काय घेवून बसलास,
त्यांना काय करायचे तू कसाही असलास.....

जेवढ तू रडत बसशील,
लोकं तेवढं हसत बसतील......

हसणाऱ्याचीच आहे हि दुनिया,
तू दाखव तुझ्या कीर्तीची किमया....,
                           दिसणं
                       मनिषा मिसाळ (लोखंडे)