...

26 views

तुच माझी सखी शोभते 🦋❤️✨
मला नेहमी आनंद देणार्या फुलपाखरा
🦋❤️
मी जेव्हा उदास असते
तू अलगद मजसवे बसते

तू इकडेतिकडे बागडते
फुलापानांवर रंग शिंपडते

तुला बघून मी मोहरते
मनी माझ्या एक कळी खुलते

दुःख सारे मी विसरते
तुझ्याचसवे मी रमते

तुला माझ्या मनीचे सांगते
तुच माझी सखी शोभते
............
- श्रेया

@Shreyara18 @writco