कविता... गंध शब्दांचा...
लिहिलेली वही चाळतांना
एकेक पान समोर जात होते
अचानक लिहिलेल्या...
शब्दांतील अक्षरावर नजर
वळली आणि परत त्या...
शब्दांतीलअक्षरांचा सुगंध मी
अंतर्मनात साठवत होते...
जसे काही शब्द पावसाला
हाकोटी देतात तसे मी त्या...
शब्दांना हाकोटी देत
अंतरात अगदी गडद...
कोरून गंध अक्षरांचा
नसानसात भिनवित होते...
आणि पाऊस जसा शब्दांना
हळूवार प्रेमाने कुरवाळतो...
तसं माझ्या शब्दांतील
अक्षरांना मी लडिवाळ...
कुरवाळून हृदयात
रूजवत होते..कारण...
त्या अक्षरांचा गंध
माझ्या शब्दात येतो..
शब्दातून तो ओळींमध्ये
प्रकटतो आणि ओळींतून...
माझ्या कवितेला शब्दगंधित
करून दूरवर पसरवतो...
आणि प्रेमवर्षाव
माझ्यावर उधळवतो....
गंध अक्षरांचा..
शोभा मानवटकर....
© All Rights Reserved