...

6 views

Valance bond
दुखा लाही वाटा फुटाव्या
Blokage मध्ये अडकलेल्या
घाणीने वेदनेसरशी सपकन
निघून जावे भळभळत!!
आणि सांगावे वैराग्याच्या
दिशेने धाव घेणार्या मनाला
बघ!!इथे तुझे असे
काहीच नाही
ना माणसे ना हे शरीर
तु परत एकदा आठव
तो क्षण या जगाला
पहिल्यांदाच पाहिलेला
आई ने मारलेली हाक
आणि वियोगाने हतबल
झालेले दोनचार
मृत्युशय्येवर
निव्वळ यंत्रवत आहे
हे क्षण हे जगणं हा श्वास
नाही नाही म्हणत
उगाच पसारा वाढवतो
काल आपल्यावर प्रेम
आहे सांगणारा
किती असे अश्रू ढाळतो?
जर तुला आता लागले
डोहाळे वैराग्याचे तर
बस कुठे तरी शांतचित्त
आणि खरेच विचार कर
दुःख, वेदना यांचा
त्याभोवती फिरणाऱ्या मन
नामक ईलेक्ट्रोनचा
Adjust कर आताच
Centripetal, centrifugal
Force काय ते !!!
आणि मुक्त कर स्वतःला
या valance bond मधून
कायमचे!!!

Bkt...
© Bkt...