...

14 views

काल रात्री अजिबच घडल....
काल रात्री अजिबच घडल
मला भयानक स्वप्नच पडल
होतो मी स्वर्गाच्या दारी
तिकडून आली एक मेनका भारी...

पहिले मी थोडं जास्तच दचकलो
नंतर कळलं मी खरंच गचकलो
नाही आता प्रश्न उत्तरी
मी आहे भूत आणि कोणीतरी......

पहिले मी मेनके शी लढलो
नंतर मी तिच्या प्रेमात पडलो
ती मला बघून हसली सारी
मी झालो आता तिचा कैवारी......

मग तिने मला स्वर्गात नेल
हळूच जोपाळ्यावर बसवल
आता माझी मजाच न्यारी
मी होतो राजा अन माजी दुनिया सारी.....

मग आल्या चार सोनपरी
घेऊन फळ अन शिदोरी
मला दिल्या खायला सारी
मी होतो मात्र भुक्कड भारी......

मी म्हटलं, " ये सोनपरी
बसणं ग माझ्या थोडया शेजारी "
तीने म्हटल, "लाजत खरी
सोशल डिस्टरबिंग पाळा आता थोड तरी

कोरोना व्हायचा ईथे सर्वरी
राहू बोमलत आपण सारी
लस निघू दे आधी कधीतरी
मग करू लग्नाची तयारी "

सोनपरी आता मलाच पटली
लग्नासाठी माझ्या मनात नटली
मेनका चा विचार करू नंतरी
आता फक्त माझी सोनाच भारी......

माझ्या मनात प्रश्नच पडला
कोरोना व्हायरस इथेही शिरला
हे देवा तुजी किमयाच न्यारी
स्वतःचीही परीक्षा घेतोस भारी....

सकाळी अचानक जागच आली
दचकन मी पडलोच खाली
पहिले थोड वाईटच वाटे
सोना होती फक्त माझ्या स्वप्नांचे साठे....

मग मी थोडा विचार केला
पाप आहे माझे जणू पाण्याचा पेला
स्वर्ग काही माझ्या नशिबी नाई
परी फक्त आता आहे माझे
विचार आणि शाई
विचार आणि शाई.

© गुरु