...

3 views

गर्लफ्रेंडला प्रपोज
आज गावात परत आली मायी ती पिचकारी
लहानपणी जिला म्या चिडवायचो भारी
नकळत मन जुळलं तिच्या प्रेमाशी सारी
म्हणून होळीच्या दिवशी प्रपोस मारायची म्या केली तयारी

लहानपणीपासून मी तिचा होतो शेजारी
काही वर्षात ती गेली शिकायला दुनियादारी
कित्येक दा मी करून थोडी शिरजोरी
आठवयचो मनात तिला लई लई भारी

दिसायला होती ती एकदम मस्त
कित्येकदा तिच्यासामोर मी व्हायचो फस्त
ती नेहमी दाखवायची स्वतःला व्यस्त
कदाचित मीही तिला आवडायचो थोडा थोडा जास्त

आज ती होळी साजरी करायला गावाला परत आली
तिला गावात बघताच म्या बनलो थोडा ताली
तिला आज मारून प्रपोज बनवतो घरवाली
शुभेच्छा द्यायच्या निम्मिताने लावतो गालावर लाली

म्हणून म्या सकाळीच पूर्ण तयारी केली
अंघोळ स्वतःच केली कारण जिंदगी अकेली
घेऊन हातात कैची बनलो स्वतःच माली
कट मारली केसाला बनून हँडसम चिकना ताली

चांगले चुंगले कपडे घालून घरासमोर गेलो
सगळ्यांले होळी खेळत पाहून लय खूष झालो
म्या आता प्रपोज मारायचा या नादात निघालो
नाचत गात म्या मस्त घरासमोर गेलो

घरासमोर लागला होता मस्त भांगचा ठेला
फुकट होती म्हणून घेतली पाच सहा पेला
नाचलो एकटं रोडवर जसा बेवडा अकेला
मन तिले शोधत म्हणे माया चकणा कुठं गेला

तिले माराच प्रपोज म्हणून मी तिले शोधत राही
ते बह्याड कुठं होळी खेळत हाय हे काही माहित नाही
मी तिले अख्ख गाव शोधतोय ठाई ठाई
पण ती मले आता कुठंच दिसत नाही

शेवटी मी नाचत डोलत गेलो तिच्या घरी
भांग होती अंगात चढून काही दिसत नव्हत बरी
पण मायी हिम्मत जणू आभाळातल्या सरी
गेलो प्रपोज मारले बनून लय लय भारी

घराजवळ जातच ती मले अंगणात उभी दिसली
म्या म्हटलं हिच वेळ हाय आता चांगली
मारतो तिले प्रपोज बनून हिम्मतवाला टांगली
तिने हो म्हणताच सिक्सर मारतो जणू गांगुली

मंग उद्या लगेच तिच्या बापले भेटाले जाईन
हुंडा नाही पाहिजे पण सोन सात तोळे घेईन
पैशाची काही लालच नाही म्हणून खर्च बापलेच होऊ देईन
माये नातेवाईक नाही जास्त पण मित्र 1200 जवाले येईल

असं म्हणून उद्या मी तिच्या बापले पटवून घेईन
माय हाय साधी ते तर अशीच पटून जाईन
भाऊ आहे भोळा त्याले चॉकलेट देऊन देईन
आजी हाय खडूस बहुतेक ते लवकरच गचकून जाईन

असा विचार करून मले लय हिम्मत आली
आता प्रपोज मारून तिले बनवतो घरवाली
भांग होती अंगात पण नशा होता इष्कवाली
हळूहळू गेलो तिच्या अंगणात बनून थोड ताली

ती उभी होती अंगणात लई लई मटकून
पण माय थोबाड पाहून वाटे मी आलोय जंगलातून भटकून
मी तिच्याकडं पायल थोडे डोळे मोळे झटकून
पण वाटलं लवकर प्रपोज मारावा नाहीतर तिचा बाप मारेल मले पटकून

म्हणून म्या डायरेक्ट तिच्या जवळ उभा राहिलो
नाकाचा शेंबूड फुसत तिच्याकड पाहून थोड हसलो
तिनं मले रूमल दिला अन म्या त्यान नाक पुसलो
शेंबडाचा रूमाल वापस करत मी खिदिखीदी हसलो

तेबी मायाकड पाहत थोडी फुसफुस हसली
तिच्या हसण्यावरून म्या समजलो हे माया प्रेमात फसली
म्हणून म्याबी तिले आपल्या हृदयात खुदु खुदु ढूसली
प्रेमाच्या नात्याने ती आता माया मनातच सजली


मी आता हसत हसत माया एका डोळा मारला
म्या डोळा मारताच तिचा चेहरा थोडा लाजला
लाजत्या चेहऱ्यान तिचा प्रेमाचा घुट मले पाजला
पण भांग जास्त पिल्यानं माया आवाज मागून वाजला

माया मागून आवाज होताच ती हुळुवार हसली
हसताच मी समजलो ती माया प्रेमात फसली
हसण एवढं गोड की ते माया नात्यात सजली
सजून धजून ती पोरगी माया हृदयात घुसली

त्यानंतर मी तिले हळूच आय लव्ह यु म्हटलं
लव्ह यु तिले म्हणताच माय हृदय धक धक धकलं
माय असं म्हणताच तिचा चेहरा असं लाजल
तिचा असा चेहरा पाहून मले लय बर वाटलं

आम्ही दोघेही तेव्हा होतो आंनदी प्रेमाच्या जाळ्यात
वाटे असं दोघांनाही की अडकलोय हृदयाच्या वाड्यात
भांग होती माया अंगात पण नशा तिचीच उन्हाळ्यात
वाटे आता लग्न व्हावं माझं अन तिच धूमधडयाक्यात

पण तेव्हड्यात एका पोट्यान मायावर मारली पिचकारी सरसर
डोळ्यात पाणी जाताच मी डोळे चोळू लागलो भरभर
डोळे उघडताच माया पाया खालची जमिनी हलली तरतर
कारण म्या भांगच्या नशात पोट्टी समजून आजीलेच प्रपोज मारला खरखर

आता मात्र मायी लेका चांगलीच टरकली
भांगच्या नशेच आग चांगलीच भडकली
माया जीव आता तिथं थोडा थोडा रडला
म्हणून म्या भक्कन तेथून पळ काढला

धावत धावत मी आता माया घरी गेलो
काय कराव सुचत नव्हतं म्हणून वेडापीसा झालो
भिजून होत अंग कारण घामाने पूर्ण न्हालो
भांगच्या नशेत केला प्रपोज पण आता पुरता मेलो

म्या होतो आता मात्र वेडापीसा घाबरून
तिच्या घरचे आता काढते मले वेडंवाकडं झोडपून
म्हणून म्या सुरक्षेसाठी होतो पलगाखाली लपून
घाबरलं होत मन म्हणून लपलो दरवाजा लावून

तेव्हड्यात मात्र दरवाज्यावर धडधड आवाज झाला
आवाज होताच मले समजलं यम घरी आला
आता मी मेलो याचा पुरता आभास झाला
धडधड आवाज होताच माझा जीव नरकात गेला

पण दरवाज्याचा आवाज आता लय वाजू लागला
लपून काही अर्थ नाही याचा साक्षत्कार मले झाला
म्हणून म्या हिम्मत करून माया दरवाजा उघडा केला
दरवाजा उघडा करताच माया जीवात जीव आला

कारण दरवाज्यावर होती ती उभी एकटी आजी
आजीला पायताच माय मन धडधड वाजी
बहुतेक आजी झोडपेल मले बनून थोडी पाजी
गोळया घालील मले बनून ती एक फौजी

म्हणून म्या भक्कन आजीच्या पाया पडलो
मारलं नाही पाहिजे म्हणून ढुंसूढुंसू रडलो
डोळयांले थुका लावत मी रडण्याचा खेळ खेळलो
माफी मागत आजीची मी खुप काही बड-बडलो

आजी म्हणे 'तु मायी माफी नको मांगू
तूबी मले लय आवडतो हे तु कुणाले नको सांगू
लग्न कर मायाशी अन बन माया तु पंगू
लग्न झाल्यावर येईल वर्षात आपलेबी चंगू-मंगू'

आजी म्हणे 'काही दिवसात आपण जाऊ इथून पळून
बाहेरच लग्न करू अन घेऊ मन जुळून
घरच्यानी स्वीकारलं नाही तर देऊ सगळं सोडून
मंग पुन्हा या गावाकडं कधी पाहू नाही वळून'

आजीच असं बोलण मले लय भयानक वाटे
म्हणून एकसारखं बघत रायलो जणू डोळयांवर आले काटे
आजी म्हणे 'मी हाय सुंदरी, माझ्याकडे सौंदर्याचे साठे
असा एकसारखं बघू नको मलाबाई लाज वाटे'

म्या म्हटलं 'अहो आजी कृपा करा मी हाय तुमच्या नातवावाणी
मले बाजीराव बनवून स्वतः नका बनून हो मस्तानी
तुम्ही हाय चांगल्या तुमाले नक्की बुडग शोधून देईन
मले आता जाऊ दया नाहीत माया जीव जाईन'

आजी म्हणे 'मले माहित आहे तु मायाशी असा कावून रायला बोलून
माया प्रेमाची परीक्षा घेत तु मले तपासून रायला तोलून
पण म्या बी प्रेमाची परीक्षा पास करण हे देते वचन मोलून
घे मायी परीक्षा म्या कॉप्या करण चोरून चोरून

माय तुयावर किती प्रेम आहे हे तुले नाही कळणार राज्या
लग्न कर मायाशी मग वाजवतो आपला बाज्या
तु बी म्हणशील मले का काय सोनपरी बायको भेटली
माया समोर त मोठीमोठी पिक्चर ची हिरोईन घटली'

आजीच्या अश्या बोलण्यान मले लई भीती वाटे
एकसारखं बघत रायलो जणू आयुष्याचे झालेय टोटे
तेवढ्यात आजी म्हणे 'मायाकडं असा कावून पावून रायला
लई बाई घाई झाली वाटते माया नवरा व्हायला'

असं म्हणत तिनं भक्कन मले एका डोळा मारला
तिने डोळा मारताच माया जीव तिथंच वारला
नर्क काय असत याचा साक्षत्कार तिथंच झाला झगडलो असतो तिच्याशी पण म्या होतो काडीपहिलवान हिम्मतवाला

माया जीव चालला होता आता लय मरू मरू
म्हणून म्या घरातून आता पळाले लागलो भुरू भुरू
मी गावात पळाले लागलो आता लई तुरु तुरु
अन आजी माया मांगे धावे लुगडं तिच धरू धरू
आजी माया मांगे धावे लुगडं तिच धरू धरू.


© गुरु