...

7 views

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
शिवाजी राजे तुमच्या जन्मा आधी
चारशे वर्ष स्वराज्य नव्हते ओ कधी
महाराष्ट्राचा बराचसा हा भाग सारा
आदिलशहा व निजामशहा ह्यांचा पहारा

अहमदनगरचा राजा व विजापूरचा राजा
ह्यांच्या मुळे महारष्ट्रातली सुखी नव्हती प्रजा
होते दोघे ही राजे मनाने हे उदार फार
प्रजेवर मात्र दिवसाला जुलुमीचे भार

शिवाजी राजे असे होते जन्मापूर्वी तुमच्या
असे जीवन आले होते वाटेला सारे प्रजेच्या
जगताना जीवनात कधीच ना मिळाले अन्न पोटभर
राब राब राबवून सुध्दा प्यायला पाणी ही मिळेना घोटभर

आपलीच मराठी माणस सुध्दा काही
त्यांचे रयतेकडे कसलेच लक्ष नाही
प्रेम तर त्यांचे देशावर कधीच नव्हते
प्रेम सारे वतनावर व जहागिरीवर होते

बर झाले शिवाजी राजे तुम्ही आलात जन्माला
सुरुवात तुम्ही केली स्वराज्य निर्माण करायला
तुमच्या मुळे तर महाराष्ट्रात सुख लाभले प्रजेला
सलाम तुमच्या शिवाजी राजे ह्या भगव्या स्वराज्याच्या शौर्यगाथेला.......

कवी ✍🏻:- स्वहित दिपक कळंबटे
© @Swahit kalambate 1044.