...

34 views

ती आणि मी
माझाच ना मी राहिलो,तूझाच मी आता;
माझाच ना मी राहिलो,तूझाच मी आता;
तुझ पाशी येण्या करिता शोधतो मी वाटा.

भेटशील तू कधी तरी,येणार असा क्षण;
भेटशील तू कधी तरी,येणार असा क्षण;
"सांगून टाकशील सर्व काही"
बोले माझे मन.

तुझ्यातले तुझेपण,तू आता राखावे;
तुझ्यातले तुझेपण,तू आता राखावे;
कोना साठी, कोठेतरी ;वेगळे का वागावे.

गोंडस तो शांत चेहेरा,निरागस त्याचे भाव;
गोंडस तो शांत चेहेरा,निरागस त्याचे भाव;
मनी कोरले त्यांनी,तुझे सुंदर नाव.


@ पवन.बाळेकर

#love😍😍😍