...

2 views

एकदा तरी सांग
एकदा तरी सांग
आपले नाते काय आहे
पहाणार्‍याला कळेल नी समजेल
अस काही नक्कीच काहीतरी सांग..
गप्प राहुन चालणार नाही
मनातले तुझ्या खरे ते सांग
हि दूनिया खूप विचित्र आहे
नको ते बोभाटे काढ्ण्या पुर्वी तु सांग..
झाली जर का नाहक बदनामी
न निघणारे लागतील दाग
वेळ नकोस लाऊ आणखीन
जे मनात आले तेच इथे सांग..
जरी बदलला निर्णय माझ्या प्रती
मला तरी कळेल नक्कीच सांग
पडणार नाही काहीही फरक
वेळ निघून गेल्यावर पडेल महाग
म्हणुन निर्णय तुझा लवकर सांग..
© k. rajshekhar