...

40 views

नव्याने तुला आठवावे...
मनाच्या गाभाऱ्यात तुला साठवावे...
पुन्हा पुन्हा नव्याने तुला आठवावे...

नयनांच्या कोपऱ्यातून तुला सांडवावे...
थेंबा थेंबात नव्याने तुला आठवावे...

आठवणीच्या वर्तमानात तुला भासवावे...
रोज रोज नव्याने तुला आठवावे...

भावनांच्या विश्वात तुला डोकवावे...
मनो मनी नव्याने तुला आठवावे...

स्पर्शाच्या सहवासात तुला अनुभवावे...
रोम रोमात नव्याने तुला आठवावे...

सूर्याच्या उन्हात तुला गारवावे...
शित शीतलतेत नव्याने तुला आठवावे...

विचारांच्या गोंधळातून तुला सोडवावे...
शब्द शब्दात नव्याने तुला आठवावे...

रचलेल्या कल्पनेत तुला गुंतवावे...
काव्य काव्यात नव्याने तुला आठवावे...

हरवलेल्या गर्दितून तुला शोधावे...
धड धडीत नव्याने तुला आठवावे...

भेटलेल्या मार्गात तुझ्या संगे चालावे...
पावलो पावली नव्याने तुला आठवावे...

दाटलेल्या हृदयात तुला पुजावे...
श्वास श्वासात नव्याने तुला आठवावे...

आयुष्याने जीवनात तुला भेटवावे...
क्षण क्षणाला नव्याने तुला आठवावे...

{POONAM}🖊️