...

11 views

स्वतः चे पाय पाळण्यात पाहताना
स्वतःचे पाय पाळण्यात पाहताना
आठवतो माझ्या जीवनाचा पाया

ग्रंथालयाची आवड व विज्ञानाचे प्रयोग
निराशा, उदासीनता नव्हते असे कुठले रोग

परीक्षा संपण्याचा आनंद व सुट्या उन्हाळ्याच्या
आनंद वेगळाच सुटयात दिवसभर खेळत राहण्याचा

ठरावीक व दिशापुर्ण असे चिंतामुक्त होते जीवन
ते पहिले प्रेम व ती न विसरू शकणारी आठवण

लहानपणीच हरवली माझी पितृछाया
काहीतरी अशीच होती बालपणीची माया

©curiously_kunal