...

6 views

बंद कपाटातील पुस्तकाने आत्महत्या केली
बंद कपाटातील पुस्तकाने आत्महत्या केली.
facebook Whatsapp च्या वापराने पुस्तके धुळ खात पडली.
त्याची सजा पुस्तकाला दीली.
वास्तव पाहुन जगातले ग्रंथालय ओस पडून खंडर झाली.
पुस्तकांच तर सोडाच मस्तक धुळ खात पडली.
पुस्तकांचं कोणी ऐकेना म्हणुन त्याची शिक्षा लेखकांना झाली.
लेखकांच्या शंडपणामुळे पीढी थंड झाली.
बंड करायच सोडुन झुंड निर्माण झाली.
पुस्तकांसोबतच साहीत्य,भाषा, संस्कृती लयाला गेली.
याची डोळा याची देह प्रचीती आली.
मित्रहो पुस्तकांची आत्महत्या थांबवा.
मस्तकाची धुळ झटका,
नाहीतर पुन्हा पुस्तक आणी मस्तक वाचणार नाहीत.
तुम्ही टीकवा वाचन संस्कृती आम्ही टिकवू लेखन संस्कृती.
तेंव्हाच थांबतील बंद कपाटातील पुस्तकाच्या आत्महत्या.
मग बगा कसा वाजतो माय मराठीचा डंका.
बंद कपाटातील पुस्तके पुन्हा एकदा
धरतील जगायचा ठेका.
वाचु लिहु नाचु गाऊ.
पुस्तकांच्या गावाला जाऊ.
पुस्तकांच्या गावाला जाऊ.
© आठवनीचा कोंडमारा