...

3 views

बदललेला काळ
बदललेला काळ
धकाधकीच्या या आयुष्यात काढावा थोडा
वेळ स्वतःच्याच आठवणीत रममाण
व्हायला बघा बसतो का ताळमेळ ....
नियतीने चक्र पालटले मांडला भावनांचा खेळ....
सावरा आतातरी स्वतःला काढा थोडा वेळ....
पाटी ,पेन्सिल ,दप्तर घाई गेलेत पडद्या आड....
भातुकलीच्या खेळाची मजाच निराळी फार....
आजच्या या डिजिटल दुनियेत सर्वांनाच हवा
अँड्रॉइड फोन अन महागडी कार....
बालपण तर हरवूनच गेले अन आईच्या हातचा मार.....
लहानशी बाहुली गोष्टीची पुस्तके असे पाठी
दप्तरी भार .....
गप्पा,गोष्टी,गाणी,मैत्रिणी जमत होत्या अंगनी
अन असे सडा रांगोळ्यांची आरास....
व्हाट्सअपच्या या नगरीमध्ये सगळेच दुरूनच करतात हात...
कुस्ती,दानपट्टा अन तलवार बाजीला तर मैफिल बसे खास....
आताच्या या धावपळीत असे व्यायामाचा पण तास....
सणासुदीची तर मजाच निराळी बदलून केला काळ....
बालपण वाटे मजेमजेचे पण झाला आता तो भूतकाळ....
#marathi #marathikavita #change#past#reallife#reality#love #care #life#whatsup
© M@ñsî