...

53 views

कोरोना...एक बोध
@Pranil_Gamre
हो आलय कोरोनाच संकट देशावर पण ते काही कायमचे नाही राहणार
खात्री आहे आपण सारे एकजुटीने त्यावर विजय मिळवणार

कुणास ठाऊक होतं हे संकट आपल्याला माणुसकी शिकवून जाईल
कारण अनपेक्षित होतं माणूस जात धर्म न पाहता मदतीस धावून येईल

जे अनेकांना जमलं नाही ते ह्या संकटाने करून दाखवलं
होताच तो जीव घेणा पण त्याने माणसात माणुसकीला जपवलंं

होत होते हाल या संकटाने लहानापासून मोठ्यांचे आपण या डोळ्यांनी पाहिले
स्वार्थी झालेल्या ह्या मनुष्याला आज दुसऱ्यांसाठी अश्रू अनावर होत राहिले

प्रत्येक देशात हा विषाणू म्रूत्यूचा तांडव करत राहिला
दर दिवशी एकेकाच्या म्रूत्यूणे माणुस थक्क होताना पाहिला

माहिती ह्या कोरोनाने आपल्या सर्वाना खूप त्रास दिला
जाता जाता सर्वांना स्वच्छता राखण्यास धडा देऊन गेला

थोडे दिवस का होइना पण सर्वांना घरात बसवून कैदी बनवून सोडलं
पशु पक्षींंनी आज पहिल्यांदा माणसाला पिंजऱ्यात घुटमळताना पाहिलं

आज ह्या विषाणूंमुळे जाणवलं मानवास पिंजऱ्यात अडकून पशु पक्ष्यांचे काय हाल होत असतील
आपण तर थोडेच दिवस बंदिस्त होतो,मग विचार करा ते जीवनभर घुटमळत नसतील

आता तरी बोध घे , मानवा कशाला जाती वादात अडकून राहतो
लक्ष्यात ठेव माणसाच्या मदतीसाठी माणूसच धावून येतो
©Pranil_Gamre
#CoronaVirus
#Corona #coronaviruschallenge
© Pranil_Gamre