...

11 views

माय
प्रातःकाळ हो ही झाली,
जाग पाखरास आलीं !
पक्षी उडती आकाशी,
भेट भुकेची घ्यायला !!

माय चालें रानोमाळी,
वाट काट्याची तुडवूनी!
लेकराच्या भुकेपायी,
चालली ती अनवाणी !!

सांज काळी घरा येई,
दिस कष्टातचं जाई !
भुकेची भरोनी झोळी,
लेकरांची वाली होई !!

स्वत: भोगते उपवास,
लेकरास मिळे घास !
जीवनाचा तिचा ध्यास,
आनंदी लेकराची आसं !!

लढण्याच्या आयुष्यात,
शिकवण देई रोजं !
उपकार तुझें, " माय "
माझ्यावरी कोटिं आज !!

© Gautam