...

6 views

का केलस तू अस.....

ज्या वळणावर तू सोडून गेली

तिथे अजुनही आभाळ दाटलेल होत

घोंघावणारा वळीव घेवून

आज ही वारं फाटलेलं होतं



फाटलेल्या वाऱ्याला माझं एकच बोलणं होतं

का काढून नेलंस तिला या भरलेल्या आकाशातून

ते आकाश ही शांत झालं होतं

तुझ्या वेदनांनी कासावीस होवून



ज्या वळणावर तू सोडून गेली

ते वळण आज माझ होत

त्या वळणावरील प्रत्येक वाटा

माझ्याच होत्या



घोंघावणारा वळीव घेवून तू

माझ्या आयुष्यात थैमान घालतस

माझ्या स्वप्नांना ओहोटी आणि

संकटांना भरती केलस



आता तो घोंघावणारा वळीव

पण माझा आहे

ती घोंघावणारी स्वप्ने

सुद्धा माझीच आहेत



ज्याप्रकारे वळीव येवून करतो

शेतकर्‍यांच्या स्वप्नांची राखरांगोळी

त्याचप्रमाणे तू

केली होतीस माझ्या स्वप्नांची स्मशानभूमी



का केलंस तू असं!

नाही विचारणार तूला मी कधी तस

आयुष्याचा एका वळणावर

थैमान घालत होतस काळजावर



ते काळीज विदीर्ण झाल होत

तुझ्या आठवणींनी विद्रुप होवुन

त्या आठवणी विसरू पाहत होते

तुझ्यासोबतच्या क्षणांना स्मरून बघत होते



जसा फुटतो झरा पाण्याचा

तसा फुटला होता झरा अश्रूंचा

त्या आसवांना थांबवत होते

का केलस तू अस विचारत होते



तुझ्या डोळ्यातुन ओघळणारा एक-एक अश्रू

मला देऊ पहात होता

तुझ्या मनातल्या एका-एका

विचारांचा पैलू



जशा विदीर्ण होतात

डोंगराच्या वाटा

तसाच काहीसा मी झालोय

तुझ्या कर्मठ विचारांचा नेता



का केलंस तू असं!

नाही विचारणार तुला कधी तस...