...

0 views

✨आई ✨
आई म्हणजे माझ्या शब्दात ,
आजन्म ईश्वरासारखी कायम पाठीशी असणारी
निस्वांर्थी , मायाळू ,अहोरात्र कष्ट करून ,
आपल्याला जगविणारी ,त्याग करणारी ,
माय माउली म्हणजे आपली आई ....

जिच्या पोटी जन्म घेतो ,
आणि मरेपर्यंत आपल्यावर ,
निस्वार्थ प्रेम करते ,
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर साथ देते ,
ती म्हणजे आपली आई ...

मायेची ऊब अन जगातलं सुरिक्षित
ठिकाण म्हणजे आई ची कुशी ,
मागण्या आधीच सगळ
काही देऊन जाते ,
ती म्हणजे आपली आई ...

मनातली अन् जीवनातली व्यथा ,
फक्त तिलाच कळते ,
न बोलताच सगळ काही समजून जाते ,
' मी आहे ना ' अस दिलासा देणारी तिचे बोल ,
असणारी आपली आई च असते ...

आपली आवड - नावड ,
सगळ काही माहीत असते ,
कसलही पोर असल तरी
आई साठी सर्व काही असते ....

चुकलो तरी रागावते ,
मनात मात्र खचते ,
संस्कार ,माणुसकी शिकवते ,
त्याग ,अन् प्रेमाचा अर्थ कळतो जिथून ,
ती म्हणजे आपली आई च असते .....

आई म्हणजे आपला पहिला गुरू ,
जिच्या डोळ्यातून पहिल्यांदा जग पाहिलं ,
जगावेगळा भाव असतो ,
प्रेमळ मायेचे लक्षण असते ,
आई म्हणजे एक श्वास असते .....

परमात्मा होते श्री कृष्ण ,
तरीही त्यांना आई ची ओढ ,
काय कमी देवाला ,
बघा अमूल्य अस आई च वात्सल्य ....

न चुकता येणारा कॉल ,
जीवन आपल्यवर ओवाळून टाकणारी ,
त्याग करून सुखाच जीवन देणारी
आपली आई ....

आई चा असेल आशीर्वाद ,
सगळ काही शक्य आहे ,
नाहीतर तिन्ही जगाचा स्वामी ,
आईविना भिकारी.....

राजनंदिनी लोमटे ..